Tuesday , September 17 2024
Breaking News

खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्याने व्याधी मुक्त जीवन

Spread the love

 

डॉ. जी. एस. कुलकर्णी; रोटरी क्लबमध्ये डॉक्टर्स डे
निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्याला जेवण पद्धतीही कारणीभूत आहे. उतरत्या वयात कर्करोग, हृदयरोग, स्मृतीभ्रंश, पेशींची कमतरता अशा अडचणी उद्भवतात. सुखी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून नियमित व्यायाम आवश्यक आहे, असे मत डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. येथील रोटरी क्लब तर्फे रोटरी हॉलमध्ये आयोजित डॉक्टर्स डे कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, खजिनदार श्रीमंधर व्होनवाडे उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, वृद्धत्व हा एक हजार असून त्यावर मात करण्यासाठी वेळोवेळी उपचार आवश्यक आहेत. पेशींची रचना जातील असल्याने वृद्धत्वामध्ये निकोटीनचे प्रमाण वाढते. अवयव जीर्ण होत चालल्यास कायाकल्प करावे. नेहमी हळद आणि लिंबू पाण्याचा वापर करावा. उपवासामुळे दीर्घायुष्य लाभत असून त्यासाठी आठवड्यातून एक दिवस उपवास करावे. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी शास्त्रोक्त पद्धतीचा व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी नेहमी पायी चालणे, पोहणे, सायकलिंग, योगा सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले.
डॉक्टर डेच्या निमित्ताने डॉ. सी. बी. कुरबेट्टी, डॉ. अरुण पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. शीतल धरणगुत्ते, डॉ. रवींद्र देवर्षी, डॉ. उत्तम पाटील डॉ. संतोष चव्हाण, डॉक. अभिषेक माने, डॉ. राहुल निर्मळे, डॉ. लक्ष्मी कुर्ले, डॉ.अमृत पाटील, डॉ. अमित होगाडे, डॉ. कौस्तुभ खांडके, डॉ. शेवंता गुजरे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दिलीप पठाडे, डॉ. सुनील ससे, आनंद सोलापूरकर, अमर बागेवाडी, डॉ. साईनाथ पाटील, रमेश पै, डॉ. अरुण पाटील, सोमनाथ परमने, सुबोध शाह, राजेश पाटील, प्रमोद जाधव, डॉ. महेश कोरे, राजशेखर हिरेकुडी, डॉ. संतोष खजन्नावर, संजय नंदर्गी, चेतन लगारे, वृषाली तारळे, डॉ. सुनिता देवर्षी, पुष्पा कुरबेट्टी, वर्षा नंदर्गी, डॉ. संदीप चिखले, सुजय शहा यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *