
निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील परमपूज्य १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आले. या हत्येचा जाहीर निषेध बोरगाव येथील अखंड हिंदू जागृत संघटनेतर्फे करण्यात आला.
हत्येच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. रविवार पेठेतील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी मूक मोर्चाची सांगता करण्यात आली.
संघटनेचे प्रमुख उमेश वास्कर व शिशिर सातपुते यांनी, देशात हिंदू धर्माचा हत्या करण्याचा कट रचण्यात येत आहे. देश विरोधी संघटनांनी देशात दहशतवादीचा प्रयत्न चालू ठेवले आहेत. याच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू संघटना कार्य करीत आहे. अखंड देशाला आहिंसाचे संदेश देणारे जैन धर्म हे पवित्र धर्म आहे.या धर्मातील मुनी महाराजांची हत्या म्हणजेच संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. याचा अखंड हिंदू जागृत संघटना तीव्र निषेध करीत आहे. साधू संतांच्या हत्या होत असलेली ही बाब गंभीर आहे.त्यासाठी सर्वच हिंदू संघटना व हिंदू नागरिकांनी आता तरी जागृत होणे गरजेचे आहे. मुनी महाराजांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी केली.
याप्रसंगी राहुल वसवाडे, उल्हास निकम, अक्षय पवार, नितीन तोडकर, निलेश नाझरे, शरद सातपूते, तेजस पाटील, गणेश वास्कर, उदय पोतदार, अभिजीत शिंगे, सचिन पाचांगे, शाम वास्कर अभिजीत चौगुलेयांच्यासह हिंदू जागृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta