निपाणीत वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही निसर्गात देव पाहणारी महान संस्कृती आहे. साधुसंतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे, म्हटले आहे त्याप्रमाणे. एक वर्ष आपण झाडांची काळजी घेतली तर आपल्या अनेक पिढ्यांची काळजी ही झाडे घेतात. विश्व परिषद बजरंग दल आणि गोंधळी परिवार यांनी केलेल्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन निपाणी परिसरातील तरुण मंडळांनी नागरिकांनी आपापल्या भागात वृक्षारोपण करावे, असे मत सच्चीदानंद महाराजांनी व्यक्त केले
विश्व हिंदू परिषद बजरंग दल व विजय गोंधळी परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने बडमंजी प्लॉट निपाणी येथे वृक्षारोपण साजरा करण्यात आले. त्या प्रसंगी महाराज बोलत होते. बडमंजी प्लॉट येथे ३० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राणलिंग स्वामी, श्र. दत्तपीठ तमनाकवाडा सद्गुरु सच्चिदानंद बाबा महाराज, रोटरी क्लबचे अध्यक्ष वीरेंद्र तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, मातृशक्ती दुर्गा वहिनींच्या प्रमुख सुचित्राताई कुलकर्णी, लक्ष्मण गोंधळी उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
ॲड. गणेश गोंधळी म्हणाले, मोबाईल फोन, लॅपटॉप, एसी, कार, स्वयंपाकघरातील उपकरणे या सर्व गोष्टी दैनंदिन जीवनातील गरजा बनल्या आहेत. त्याचा पर्यावरणावर परीणाम होत आहे. तो रोखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्राणलिंग स्वामी म्हणाले, ऑक्सिजनची खरी किंमत आपल्याला कोरोनाच्या काळात कळाली आहे. तरी समाजातील प्रत्येकांनी याची जाणीव ठेवून एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केल्यास भविष्यात कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचे सांगितले.
यावेळी सागर श्रीखंडे विद्या मंदिरचे मुख्याध्यापक पाटील, विमल भंडारे, बाळकृष्ण मांगोरे, सुवर्णा गोंधळी, सोम्या गोंधळी, आर्या भंडारे, सर्जेराव भाट, किरण भाट, विजय गोसावी, रोहन मस्के, सचिन मैत्री, देवा सुरवंशी यांच्यासह बडमंजी प्लॉट मधील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.