राजेंद्र पवार: नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य वडर समाजासाठी मंगळवारी (ता. १८) रोजी चित्रादुर्ग येथे भोवी जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भोवी समाज वधु-वर मेळावा आणि भोवी समाजातील राज्यातील गुणवंत विद्यार्थांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील भोवी समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य व बेळगांव जिल्हा वडर समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार- वडर यांनी केले आहे.
राजेंद्र पवार म्हणाले, भोवी समाज हा कष्टाळू असून समाजातील कठीण कामे करून आपला उदर निर्वाह करीत आहेत. समाजातील गरीब, हुशार आणि गरजू विध्यार्थी जे चांगल्या गुणांने उत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांचा राज्य भोवी समाज संघटनेकडून गौरव करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील भोवी समाजातील खासदार, आमदार, स्वामीजी, नेते, कार्यकर्ते यांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय भोवी समाजातील मुला -मुलींचे लग्न जुळविण्यासाठी भोवी समाज वधू- वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात उच्य शिक्षित आणि कमी शिक्षित मुला-मुलींचे लग्न जुळत नाहीत. त्यामुळे या मेळाव्याचे आयोजन केले आहे. भोवी समाजातील समस्या, आडी अडचणी आणि इतर विकासात्मक ध्येय धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील भोवी, वडर समाजातील नागरिकांनी ने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा भोवी समाज उपाध्यक्ष राजेंद्र पवार वडर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta