मेतके, आदमापुर येथे अमावस्येला भाविकांची गर्दी; दिवसभर बस स्थानक परिसर गजबजला
निपाणी (वार्ता) : प्रत्येक अमावस्याला देव देवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. श्रीक्षेत्र, मेतके, आदमापुर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी निपाणी आणि परिसरातील शेकडो भाविक सोमवारी (ता.१७) अमावस्येनिमित्त ये -जा करीत होते. त्यामुळे निपाणी बस स्थानक परिसर गजबजून गेला होता. शिवाय मुरगुड रोडवरील गीतांजली चित्रमंदिर शेजारी असलेल्या वडापाव वाहतुकीमुळे दिवसभर वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली. मात्र या ठिकाणीही एकही पोलीस नसल्याने वाहनधारकासह भाविकांची मोठी गैरसोय झाली.
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग केल्याने रस्त्यावर वाहने आणि पदचाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येते आणि आदमापूर येथील संत बाळूमामांच्या दर्शनासाठी कर्नाटक सीमाभागातील हजारो भाविक दर अमावस्येला जात असतात. मात्र वार्षिक यात्रा, भंडाराचे नियोजन वगळता या श्रावणापूर्वी येणाऱ्या अमावस्येला यात्रेच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होते.
दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्याने भाविकांचे मात्र हाल झाले.
संत बाळूमामाच्या बकऱ्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याने या देवालयाकडे गेल्या दहा वर्षात प्रचंड प्रमाणात धान्य, पैशाच्या रूपाने काही कोटीं रुपयांचे दान आले आहे.
तेथे जाणाऱ्या भाविकांला मंदिरात चांगल्या पद्धतीने दर्शन सुविधा, अन्नछत्र, भक्तांना प्रसाद, एक हजार जणांना शौचालय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येते व आदमापुर ही छोटी गावे आहेत. मात्र अमावस्यांना ही गावे भाविकांनी गजबजूवून जात आहेत. प्रत्येक अमावस्या आणि भंडारायात्रेच्या वेळी निपाणी भागातील भाविकांची गर्दी असल्याने बस स्थानक आणि मुरगुड रोड परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. यावेळी महिला आणि वृद्ध भाविकांची मोठी गैरसोय होते.त्यासाठी अमावस्या आणि यात्रेच्या वेळी या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
——————————————————————-
अमावस्या दिवशी निपाणीचा व्यवसाय जोरात
प्रत्येक अमावस्याला मेतके आणि बाळूमामा सह इतर देवस्थानला जाण्यासाठी भाविकांची निपाणी बस स्थानक परिसरात मोठी गर्दी असते. त्यानिमित्ताने फेरीवाले आणि हॉटेल व्यवसायिकांचा व्यवसाय मात्र जोरात होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta