Monday , September 21 2026
Breaking News

जैनमुनी हत्या प्रकरण; आरोपींना न्यायालयीन कोठडी

Spread the love

 

बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या खून प्रकरणातील आरोपींना 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश चिक्कोडी न्यायालयाने आज दिला. त्यामुळे आज दोन्ही आरोपींना हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे.
जैन मुनी हत्याकांडातील आरोपी नारायण माळी आणि हसन धालायत हे गेल्या सात दिवसांपासून पोलिस कोठडीत होते. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चिक्कोडी पोलिसांनी दोघाना सोमवारी दुपारी चार वाजता चिक्कोडी शहर वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडिगेर यांच्यासमोर हजर केले. दोघांनाही न्यायाधीश बडिगेर यांनी 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना कडेकोट बंदोबस्तात बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले. यावेळी चिक्कोडी न्यायालयाच्या आजूबाजूला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे चिक्कोडी डीवायएसपी बसवराज यलीगर आणि सीपीआय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *