उपाध्यक्षपदी शितल लडगे यांची बिनविरोध निवड
निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड ग्राम पंचायतच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री किरण पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भाजपाचे शितल रामगोंडा लडगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवडणूक करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून महातेंश हरोले यांनी काम पाहिले. निवडी नंतर पदाधिकाऱ्यांच्या समर्थकानी फटाके व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष येथील निवडीमध्ये भाजपाचे चार व राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य असे दोन्हीकडे समान सदस्य असल्याने सर्व पक्षीय नेते जाणकार मंडळी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन शिरदवाड गावच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीला तर दुसऱ्या टप्प्यात भाजपाला अध्यक्षपद देण्याचे ठरवुन अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची निवड बिनविरोध केली.
नूतन अध्यक्षा जयश्री पाटील म्हणाल्या, मला सर्वांच्या सहकार्याने अध्यक्षपदाचा मान मिळाला. सहकार नेते रावसाहेब पाटील, मार्गदर्शक उत्तम पाटील, माजी अध्यक्ष सुरेश खोत व सर्व सदस्यांच्या मदतीने गावचा विकास करणार असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष शितल लडगे म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले सदस्य व कार्यकर्त्यांचच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करुन पुढच्या दोन टप्प्यांत आपल्या भाजपा गटाला अध्यक्ष पदांची ठरल्याप्रमाणे संधी मिळणार असल्याचे सांगितले. बाळासाहेब पाटील, संजय पाटील, कुमार पाटील, गोटू पाटील, यांनीही मनोगत व्यक्त केले. विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी माजी अध्यक्ष सुरेश खोत, सदस्य आण्णा पाटील, तलाटी एस. एम. नेमण्णावर, किरण पाटील सदस्य, नागरिक, ग्रामस्थ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta