Saturday , November 7 2026
Breaking News

मोहरमच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची खडेबाजार पोलीस स्थानकात बैठक

Spread the love

 

बेळगाव : इस्लामिक पहिल्या महिन्याची म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात मोहरम महिन्यापासून केली जाते. यंदा २९ जुलै रोजी होणाऱ्या मोहरम ताजियाची सुरुवात १९ जुलै पासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक खडेबाजार पोलीस स्थानकात बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मोहरम उत्सवाच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, पीएसआय सौदागर ए. के. धारवाडकर, प्रवीण तेजम, विकास कलघटगी, मोहन कारेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर ए. आय. कटाबळे, देवेंद्र कांबळे, भाऊ किल्लेकर, गजानन शहापूरकर, संदीप चौगुले, समीउल्ला पठाण, मोहम्मद साबीर शेख, अलिसाब मुजावर, राहुल जाधव, हाजीअली नूरानी आदी सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *