Tuesday , March 3 2026
Breaking News

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्सचे यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : इंडिया तायक्वांदो, कर्नाटक ऑलंपिक असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर यांच्यामार्फत ४० वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा बंगळूर कोरमंगल इनडोअर स्टेडियम येथे झाल्या. क्योरगी व पुमसे विभागात खुल्या स्पर्धा व सब जुनिअर कॅडेट ज्युनियर व सीनियर विभागात यशस्वी पार पडल्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
खुल्या स्पर्धेमध्ये १२ वर्षाच्या आतील विभागात अवनी कुलकर्णी सुवर्ण पदक, आरोशी बोधले सुवर्ण पदक, रुहि बोधले कास्य पदक, पुष्पा पाटील रौप्य पदक, अवनी व्हधडी कास्य पदक, लावण्या सावंत कास्य पदक पटकाविले. मुलांच्या विभागात
समर्थ निर्मले सुवर्ण पदक, कास्यपदक, श्लोक मलाबादे रौप्य पदक व एक कास्यपदक, अथर्व शेळके रौप्य पदक, सारंग अक्की यांनी रौप्य पदक पटकावले.
सीनियर विभागात प्रथमेश भोसले, देवराज मल्लाडे, ओमकार अलकनुरे, आदित्य सोलापूर यांनी अंतिम फेरीपर्यंत लढत दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक बबन निर्मले यांचे मार्गदर्शन तर पालकांचे प्रोत्साहन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *