निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या गांजा विकत असताना सदलगा पोलिसांनी धाड टाकून बोरगाव येथील दोघा युवकांना अटक केली आहे. पद्माकर अभयकुमार उपाध्ये (वय ३५) व अभिषेक बाबासाहेब माळी (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पद्माकर उपाध्ये व अभिषेक माळी हे अनेक दिवसापासून बोरगावसह परिसरात गांजा विक्री करत होते. जवळच्या महाराष्ट्र राज्यातून बेकायदेशीरपणे गांजा आणून बोरगाव परिसरात गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदलगा पोलिसांनी सापळा रचून शहरापासून काही अंतरावर असलेल्या आयको ठिकाणी रस्त्यावर खुलेआम गांजा विक्री करतानाच रंगेहाथ पकडून त्यांच्यावर धडक कारवाई केली. त्यांच्याकडून ३२० ग्रॅम गांजा जप्त केले. या धडक कारवाईमुळे गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून संशयितांची हिंडलगा कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, हवालदार कुमार ईळीगेर, संतोष बडोदे, महांतेश फडतारे, पुंडलिक लमाने, सुरेश हुगार यांनी ही कारवाई केली. यापूर्वीही बोरगाव येथे गांजा जप्त करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर हे शहर असल्याने महाराष्ट्रातून गांजाची तस्करी होते का, याबाबत पोलिसांनी सुरू केला आहे.
—
Belgaum Varta Belgaum Varta