कोगनोळी : कोकण पट्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे व कुर्ली परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पावसामुळे नदीकाठावरील पीके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच राहिल्यास महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे.
येथील कुर्ली-चिखली बंधाऱ्यावर नदीचे पाणी आल्याने आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. तर पावसामुळे येथील हालसिद्धनाथ तलावाचे पाणी बाहेर पडले आहे. दरम्यान यंदा पावसाने उशिराने साथ दिल्याने जूनअखेर ओसंडून वाहणारा तलाव जुलैअखेर भरला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta