निपाणी (वार्ता) : जत्राट येथील ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षा राणीताई राघवेंद्र कांबळे यांचा निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फौंडेशन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षा कांबळे यांनी साकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जनतेच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी स्वतः लक्ष देऊन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. जत्राट ग्रामस्थांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. संस्थेचे अध्यक्ष हिटलर माळगे यांनी, रणीताई कांबळे या शिक्षित असल्याने जनतेची सेवा करण्यात तत्पर राहतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास वकील सुखदेव वराळे, महिपाल नवले, वैभव माने, सागर पोळ, बाबुराव कांबळे, सुनीता कांबळे, सागर पाटील, सगर कांबळे, युगांतरी काळे, शितल एस. यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सारिका पाटणकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta