Friday , March 6 2026
Breaking News

निपाणीतील बगाडे प्लॉट येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शहरातील उपनगरतील बगाडे प्लॉटमधील बंद असलेला बंगला फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना घडली. घर मालक बाहेरगावी नोकरीसाठी असल्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र किरकोळ लहान मुलांचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत.
याबाबत घटनास्थळावर समजलेली माहिती अशी, बगाडे प्लॉट येथे सरताज इचलकरंजे यांचा बंगला आहे. ते नोकरीनिमित्ताने परिवारासह रायगडला वास्तव्यास आहेत. चोरट्यानी रात्री बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. घरातील तिजोरी
फोडून सर्व साहित्य विस्कटले. मात्र चोरांच्या हाती मोठा कोणताही मुद्देमाल मिळाला नही. त्यामुळे कपाटातील मुलांची अंगठी व ब्रेसलेटघेऊन चोरांनी पोबारा केला. किमती ऐवज घरी न ठेवल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात ही घटना आल्याने शेजाऱ्यांनी ही माहिती घरमालकांना दिली. घरमालकांनी नातेवाईकांच्या माध्यमातून घरात पहाणी केली. याबाबतची नोंद पोलिसात झालेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

आला उन्हाळा, वाहनांना सांभाळा!

Spread the love  वाढत्या तापमानामुळे आग; स्वतःसह वाहनांची घ्या काळजी निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *