Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत शुक्रवारी मोफत नेत्र व मोतिबिंदू शास्त्रक्रिया तपासणी शिबिर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हास्पीटल आणि निपाणी रोटरी क्लब, यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.२५) सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल, (रोटरी ब्लड बँक) येथे होणार आहे.

मोफत नेत्र तपासणी, कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी संबंधी आजारावर मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तरी गरजुंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी यांनी केले आहे. यावेळी निपाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरू तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, खजिनदार श्रीमंधर होनवाडे के. एल.ई.एस. रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष दिलीप पठाडे व रोटरी सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *