Monday , September 21 2026
Breaking News

चांद्रयान-3 लॅंडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज, वातावरण पोषक असल्याची इस्रोची माहिती

Spread the love

 

श्रीहरिकोटा : भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. चांद्रयान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार असून अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे.

भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-3 लॅण्ड व्हायला अवघे दोन तास उरलेत आणि भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याकडे लागलंय. आज सायंकाळची सहा वाजून 4 मिनिटांची वेळ भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा चांद्रयान-3 चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे.

भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-3 मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. 2019 मधील चांद्रयान-2चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-3 साठी संपूर्ण काळजी घेतलीय. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *