निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली (ता.निपाणी) येथिल सिद्धेश्वर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेसाठी विद्यार्थ्यांच्या व्दारे इस्त्रोला शुभेच्छा दिल्या. मोहीम यशस्वी झाल्यानंतर मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना गोड खावू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्त्रोच्या ऐतिहासिक चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली. इस्त्रोव्दारे या यशस्वी मोहिमेचे थेट प्रक्षेपण केले गेले. देशभरातील विद्यार्थ्यांनी हे प्रक्षेपण अनुभवल्यामुळे भविष्यात नव अवकाश संशोधकासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचे एस. एस. चौगुले त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta