निपाणी (वार्ता) : पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर दवंदी घाट उतारावर हॉटेल अमर नजीक धोकादायक वळणावर स्टील पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक प्रदीप (वय ५०) हा जागीच ठार झाला. तर क्लीनर रंगनाथन (वय २०) रा. दोघेही तामिळनाडू हा गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (ता. २३) सायंकाळी झाला. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.
ट्रक चालक प्रदीप हा बंगळुर येथून मुंबईकडे जात होता. त्याचा ट्रक निपाणी जवळील तवंदी घाटाजवळील हॉटेल अमरनजीक धोकादायक वळणावर आला असता, त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक दुभाजकावर पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील भरलेले स्टील पाईप रस्त्याच्या दुतर्फा विस्कटून पडल्याने दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान घटनास्थळी उपनिरीक्षक उमादेवी हवालदार पी.एम. गस्ती यांनी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta