साफ करण्याची मागणी : नागरिकांना त्रास
कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथील वेदगंगा नदी घाटावर चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब चिखल व इतर घाणीची स्वच्छता करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे.
कुरली येथील वेदगंगा नदीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घाट बांधण्यात आला आहे. मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे थोड्या प्रमाणात नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्याबरोबर घाटावर मोठ्या प्रमाणात चिखल येऊन पडला आहे. यामुळे नदीला जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. आप्पाचीवाडी, भाट नांगनूर, कुरली येथील नागरिकांना नदीवर देवकार्यासाठी जाण्यासाठी चिखल असल्याने कठड्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब नदी घाटावरील स्वच्छता करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta