राजू पोवार; मंगळवारचा मोर्चा होणारच
निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी मंगळवारी (ता.२९) आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असताना रयत संघटनेचे बेळगाव जिल्ह्याचे नेते वकील यल्लाप्पा हेगडे यांच्यावर मुर्गेश निराणी आणि त्यांच्या बंधूनी गुंडाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला घडवून आणला. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केली. येथे आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीसाठी १४ तास वीज मिळावी. याशिवाय शॉर्टसर्किटमुळे झालेल्या पिकांचे नुकसान, शेतकरी, जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळावी. अशा विविध मागण्यांच्यासाठी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रयत संघटनेच्या नेते पदाधिकांच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाल्यास रयत संघटना कधीही शांत बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला.
यावेळी निपाणी तालुका उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, कलगौडा कोटगे, नामदेव साळुंखे, महेश जनवाडे बाबासाहेब पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta