निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकाविले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
येथील श्री व्यंकटेश पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये झालेल्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये मुलांच्या गटात विवेक माने याने भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक, नीरजकुमार कुन्नूरेने पाच कि.मी. चालण्याच्या शर्यतीत प्रथम, वासू बोरगंडे याने गोळा फेक आणि थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. बिरू हुस्कनवर याने ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम, देवदत्त साळुंखे याने द्वितीय, शुभम अवडखान याने उंच उडी प्रकारात प्रथम तर संजय रांगे याने द्वितीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटात यल्लव्वा बन्ने हिने ४०० आणि ८०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक, गौरी कलागते हिने १५०० मीटर धावण्यात प्रथम, प्रज्ञा चव्हाण हिने ३००० मीटर चालण्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.सांघिक खेळामधील कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल स्पर्धेत बागवाडी महाविद्यालयाच्या संघाने अव्वल स्थान पटकावले. मुलींच्या गटात कब्बडी, थ्रो बॉल प्रकारात प्रथन क्रमांक तर रिले धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या आणि मुलींच्या गटाने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक सिध्दू उदगट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. केएलई संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे संचालक प्रविण बागेवाडी, पदवी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी, पदवी पूर्व प्राचार्या एच. डी. चिकमठ यांच्यासह प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Belgaum Varta Belgaum Varta