सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. बेनगेरी; ‘संप्रीती’, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांचा समारोप
निपाणी (वार्ता) : कोरोना रोगावर लस तयार करणे, युपीआयद्वारे पैशाचे हस्तांतरण, चांद्रयानच्या यशामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता भारताकडे लागले आहे. भारत एक दिवस एक मजबूत आर्थिक लोकशाही देश म्हणून जगामध्ये चमकेल, असे मत बेळगावचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. बेनगेरी यांनी मत व्यक्त केले.केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात आयोजित ‘संप्रीती’, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा समारोप समारंभ व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी होते.
डॉ. बेनगेरी म्हणाले, आपले भारतीय जगाच्या व्हिज्युअल कंपन्या गुगल, एम. ब्रँडसह अमेरिकेच्या नासामध्येही सेवा देत आहेत. ते या देशाच्या मातीची गुणवत्ता आणि ताकद जगाला वारंवार सांगत आहेत. त्यामुळे तुमची जमीन, पाणी आणि संस्कृती याविषयी तळमळ बाळगा. पाठ्यपुस्तकासह विविध कौशल्यांमध्ये पारंगत होऊन एक सक्षम नागरिक व्हा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
लक्ष्मी मंठूर, अभिषेक ढेरे, रेवन्ना कौलापुरे, साक्षी पाटील यांनी आपले विचार मांडले. यावेळी डॉ. एस. एम. रायमाने यांनी लिहिलेल्या ‘साहित्य संतृप्ती’ या मराठी समिक्षा ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. एस एम रायमाने यांचा व इतर साहित्य कृती संपादित केल्याबद्दल प्रा. विजय धारवाड, प्रा. शंकरमूर्ती के. एन., डॉ. बी. एम. जनगौडा यांचा सत्कार झाला.
राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी रँक विजेते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युनिव्हर्सिटी ब्लूज असलेल्या चार विद्यार्थ्यांचा गौरव झाला. शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धेत सोगल हलगेकार आणि सूरज शिंत्रे यांनी समग्र वीरता पुरस्कार आणि सन्मान चिन्ह पटकावले. मुलींच्या गटात नेहाल नाडगे यांनी प्रशस्ती मिळविली. रेवणसिद्धा कौलापुरे याने बी. ए. श्रेणीत आदर्श विद्यार्थी पुरस्कार साक्षी पाटील हिने बीएससीमध्ये आदर्श विद्यार्थ्यांनी पुरस्कार पटकविला. एमएससी पदव्युत्तर श्रेणीत लक्ष्मी मंतूर हिला गौरवण्यात आले.
विविध विभागांनी आयोजित केलेल्या निबंध, भित्तिचित्र, गीत गायन, स्वरचित कविता, भाषण प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
डॉ. एस.आर. पाटील, प्राध्यापक, अंतिम वर्गातील विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते. उपप्राचार्य आर. जी. खराबे यांनी स्वागत केले. आयक्यूएसी समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. क्रीडा विभागाचे उपाध्यक्ष प्रा. विजय धारवाड यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. दीपा कोप्पल, नमिता नायक यांनी संचालन केले. प्रा. शशिधर कुंभार यांनी आभार मानले.