Saturday , November 7 2026
Breaking News

विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने पिता-पुत्राचा मृत्यू; बैलहोंगल तालुक्यातील घटना

Spread the love

 

 

बेळगाव : विजेच्या तारेला स्पर्श होऊन पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली.

प्रभू हुंबी (वय 69) व मंजुनाथ हुंबी (29) अशी दुर्दैवी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. घरासमोरील विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श होऊन एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. घराजवळील कचरा काढत असताना हा अपघात झाला.

वीज तारेचा स्पर्श झाल्याने वडील प्रभू हुंबीला विजेचा धक्का बसला त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही मृत्यू झाला. ही घटना दोडावडा पोलीस ठाण्यात घडली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *