निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालय ग्रंथालयातील कर्मचारी ज्योती म्हाळुंगे यांचा २३ वर्षे सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी यांच्या हस्ते व मानपत्र देऊन, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते तर ग्रंथालय विभागाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्टाफ वेल्फेअर कमिटीचे निमंत्रक डॉ. आनंद गाडीवडु यांनी केले. प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे म्हणाल्या, अत्यंत बोलका स्वभाव, मनमोकळा संवाद या त्यांच्यातील गुणामुळे कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असतानाही महाविद्यालयातील कर्तव्यात कधीच त्यांनी कसूर केली नाही. ग्रंथालय, पतसंस्था आणि परीक्षा विभागात त्यांनी अत्यंत मनापासून काम केल्याचे सांगितले.
डॉ. आर. के. दिवाकर, डॉ. अशोक डोनर, बंडा घोरपडे, डॉ. भालचंद्र आजरेकर, कार्यालय अधीक्षक दत्तात्रय पाटील, पर्यवेक्षिका एस. पी. जाधव यांनी मनोगतातून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला संचालक प्रदीप मोकाशी यांनी, कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्परतेने ग्रंथालयात म्हाळुंगे यांनी उत्कृष्ट सेवा दिल्याचे सांगितले. सदानंद झळके यांनी मानपत्राचे केले.
ज्योती म्हाळुंगे यांनी, महाविद्यालया तील सर्व घटकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य अशोक पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. कृष्णामाई कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta