गटशिक्षणाधिकारी नाईक; आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
निपाणी (वार्ता) : शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देतात. आदर्श नागरिक घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. तो समाजव्यवस्थेला दिशा देणारा मार्गदर्शक गुरू असतो. प्रत्येकाच्या जीवनात आई- वडिलांबरोबरच शिक्षकाचे मोठे महत्त्व आहे, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. जिल्हा आणि तालुका पंचायत शिक्षण विभाग आणि निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे शिक्षक दिनानिमित्तआयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार शशिकला जोल्ले होत्या.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाले. यावेळी तालुका आणि जिल्हा पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. डी. कुंभार, सुनिता कोगले, टी. बी. लोकरे, महादेव कोरव, एल. बी. बिरादार-पाटील, सी. व्ही. खामकर, ए. बी. मुजावर यांचा सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्ती निमित्त चंद्रशिला पाटील, बापूसाहेब परीट, कुबेर धनवडे, माणिक शिरगुप्पे, रमेश भायनाईक, सुवर्णा खोत, भरत पाटील, शोभा कटारे, महावीर कांबळे, सुनीता मिरजे, उषा चौगुले, कल्पना चिंगळे, सुभाष कुंभार, पुंडलिक सुतार, कुबेर दानवाडे, सुदर्शन ठाणे, अजित कुडचे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, नराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्या निता बागडे, सभापती राजु गुंदेशा, प्रणव मानवी, अभय मानवी, क्षेत्र समन्वय अधिकारी आर. ए. कागे, प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष सदाशिव वडर, उपाध्यक्ष पी. पी कांबळे भास्कर स्वामी, एम. वाय. गोकार, रावसाहेब जनवाडे, प्रा. सुरेश कांबळे वाय. बी. हंडी, सुनील शेवाळे यांच्यासह नगरसेवक विविध शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta