Wednesday , April 22 2026
Breaking News

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त विठ्ठल केंपन्नावर यांचा सत्कार

Spread the love

 

 

बेळगाव : श्री. विठ्ठल केंपन्नावर हे भारतीय सैन्य दलाच्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी हे होते.
कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, हलगेकर कुस्ती संघटनेचे संचालक अशोक हलगेकर, मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, पैलवान कृष्णा पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला संघटनेचे माजी अध्यक्ष वैजनाथ भोगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी श्री. विठ्ठल केंपन्नावर यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे मान्यवरांनी केली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नवरतनसिंग पनवार, खानापूर कुस्ती संघटनेचे सेक्रेटरी हनुमंत गुरव, संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, भावेश बिर्जे, जयवंत दंडगलकर, वसंत जाधव महादेव पाटील, भरमा अलारवाड, नरहरी माळवी, एनएसएस कोच विश्वास पवार, अथलेटिक कोच शिंत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
शेवटी सुहास हुद्दार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *