निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रावण मासानिमित्त अंबाबाई चौकातील श्री. आदिशक्ती व शिवशक्तीचा श्रीफळ शिवलिंग महाजप कार्यक्रम झाला. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते नारळापासून बनवलेल्या महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी भावी काळात एक परिस्थिती चांगली राहण्यासाठी दीड तास महादेवाचा जप केला. पिंडीची महाआरती झाल्यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवून या पिंडीचा
नारळ व केळी प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात आला..
कार्यक्रमास विजयराजे निपाणकर, युवराज सिद्धोजीराजे निपाणकर, सुकीर्तीराजे निपाणकर, राजेश्वरीराजे निपाणकर, राजकुमारी ऋतंबराराजे निपाणकर, वेदांतिकाराजे पाटणकर, ललिता माने, प्रियांका गायकवाड यांच्यासह पायी दिंडी सोहळा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta