निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी मधील संत सेना महाराज मंदिरात संत सेना महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने झाली. त्यानिमित्त पूजा, पुष्पवृष्टी आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली.
येथील संत नामदेव मंदिरात सकाळी मंडळाचे अध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष विशाल राऊत, खजिनदार शैलेश चव्हाण, सेक्रेटरी हेमंत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून संत सेना महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मंदिरात आल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी नितीन साळुंखे, सुनील राऊत, अशोक राऊत, विनायक माने, प्रदीप माने, दत्ता माने, उत्तम राऊत, विनायक राऊत, सिद्धार्थ साळुंखे, प्रवीण टिपूकडे, रोहित माने, संकेत नागावकर, दत्ता शिंदे, आकाश माने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta