निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथे आयोजित जिल्हा पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ८ रेंज मधून ३२ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांनाअखिल भारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव व देवचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच भालचंद्र अजरेकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्या संघांची चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. माध्यमिक विभागात मुलांमध्ये सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली- व के. एस. आर. हायस्कुल अळगवाडी (रायबाग)
मुलींमध्ये टी. के.पाटील हायस्कूल, नंदगाव (अथणी) व जी. एच. एस. हूनकुप्पी, (मुडलगी) या संघानी यश मिळवले.
प्राथमिक विभागाच्या मुलांच्या गटात जुनैदिया कुडची (रायबाग )व के. एच. पी. बी. एस. अरभावी (मुडलगी)
मुलींमध्ये के. एच. पी. एस. हुलगबाळी (अथणी) व के.आर. सी. आर. एस. हंचिनाळ (निपाणी) या संघांनी विजय मिळवला.
प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, खेळामध्ये खेळाडूंनी काळानुसार बदल करून नवनव्या पद्धती, तंत्र आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास श्रीनिवास पाटील, अरुण निकाडे, संजय शिंत्रे, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी एम. बी. सांगले, व्ही. के. सन्मुरी, एस. बी. जोगळे, एस. एन. बुर्लट्टी, एस. आर. नूरजे, एस. वाय. एलहट्टी, बी. एस. पाटील, एम. एच. कटगेरी, अशोक माने, कुमार माळी, शिवाजी चौगुले, रोहित पाटील, सीताराम चौगुले, पी. एस. यादव, प्रशांत माळी, सुरेश ढगे, आदेश आबणे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta