निपाणी (वार्ता) : येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम आयटी कॉलेज येथे पीयुसी जिल्हास्तरीय तायक्वांदो, ज्युदो व कराटे स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत तायक्वांदो या क्रीडा प्रकारात ५९ किलो वजन गटात मुलींच्या गटामध्ये सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या तनुजा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय श स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग, गोकाक तालुक्यातील एकूण ८० पेक्षा जास्त मुला- मुलींनी सहभाग घेतला होता.
तनुजा पाटील हिला कॉलेजचे क्रीडा शिक्षक एस. सी. उदगट्टी, तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा पंच म्हणून प्रवीण पाटील- संकेश्वर, उमाजी पवार -कागल, प्रथमेश भोसले, देवदत्त मल्लाडे, अर्जुन बूर्ली, महेश ठोंबरे, अरुण राठोड,ओमकार अलकनुरे, यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष विजय बजंत्री, खजिनदार प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta