निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाची चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून विभागीय व्हॉलीबॉलस्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल विजेत्या संघातील खेळाडू व त्यांचे पालक यांचा सत्कार कार्यक्रम सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.बेंगळुरू येथील आयबीएम कंपनीचे सिनिअर अभियंता सुभाष निकाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. त्यानंतर सुभाष निकाडे यांच्या हस्ते क्रिडा शिक्षक ए. ए. चौगुले व व्हॉलीबॉल संघातील खेळाडू वैभव ढगे, सोहम पाटील, अभिषेक हेरवाडे, गणेश माळी, सिद्धार्थ चौगुले, पारस पंडे, उत्कर्ष पाडेकर, राजवर्धन पाटील, अथर्व शिंत्रे, वैभव माळी, विघ्नेश शेटके, नागराज मुर्डेकर यांच्यासह पालकांचा सत्कार करण्यात आला. सुभाष निकाडे यांनी खेळाडूना आवश्यक साहित्य खरेदीसाठी सहकार्य केले. विजेत्या संघाचे परिसरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन तर टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta