Monday , June 8 2026
Breaking News

बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.२८ कोटीचा नफा

Spread the love

 

अध्यक्ष उत्तम पाटील : जिल्ह्यात संस्था पहिल्या क्रमांकावर

निपाणी (वार्ता) : शासकीय अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी बंद पडत असलेल्या बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून आर्थिक वर्षात १ कोटी २८ लाखावर रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची ४७ वी वार्षिक सभा अरिहंत सभागृहात सोमवारी (ता.१८) झाली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, संघाचे २ हजार ९८३ सभासद, २ कोटी ३८ लाखावर भाग भांडवल, ८ कोटी ५८ लाखावर निधी, ४५ कोटी २५ लाखावर ठेवी, २३ कोटी ६९ लाख ७ हजाराची बँक शिल्लक, ३ कोटी ९४ लाखावर गुंतवणूक, १६ कोटी ७२ लाख ८२ हजारावर बँक कर्ज, ४१ कोटी ४५ लाखावर एकूण कर्ज दिले असून त्याची शंभर टक्के वसुली केली आहे. त्यामुळे संघाला यावर्षी १ कोटी २८ लाख ६४ हजारावर नफा झाला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संघाला सलग ६ वर्षे ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
तत्पूर्वी जैन इरिगेशनच्या विजय माळी, अनिल साळवे यांनी ठिबक सिंचन व पीक पद्धती याबाबत संचालक सभासद व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
व्यवस्थापक आर. टी. चौगुले यांनी नफा तोटा पत्रकाचे वाचन केले.
यावेळी, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, पृथ्वीराज पाटील, संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, राजू गजरे, मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी रावसाहेब चौगुले, नगरसेवक अभय मगदूम, जावेद मकानदार, पिंटू कांबळे, प्रदीप माळी, रोहित माने, दिगंबर कांबळे, तुलसीदास वसवाडे, माणिक कुंभार, अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, डॉ.‌शंकर माळी, अशोक बंकापुरे, बाबासाहेब निकम, गजानन कावडकर, अशोक अम्मनावर, रोहित पाटील, बी. जे. पाटीलयांच्यासह संघाचे सदस्य नगरसेवक उपस्थित होते. आर. एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक राजेंद्र ऐदमाळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रोडवरील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *