अभियंते गजानन वसेदार : निपाणीत अभियंता दिन
निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बांधकाम व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले असून व्यवसाय स्पर्धात्मक बनला आहे. याशिवाय ग्राहकांच्या अपेक्षाही वाढत चालले आहेत. या अपेक्षा समजावून घेऊन काम करण्याची जबाबदारी प्रत्येक अभियंत्यावर आली आहे. त्यानुसार प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून काम केल्यास या व्यवसायात प्रगती होणार असल्याचे मत अभियंते गजानन वसेदार यांनी केले. येथील आराम कार्यालयात इंजिनीयर असोसिएशन ऑफ आर्किटेकतर्फे आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजेश पाटील होते.
याप्रसंगी बांधकाम क्षेत्रात अनेक वर्षे अभियंता म्हणून योगदान दिलेले अजित नरके व दीपक माने यांना जीवन गौरवपुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. एम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. अभियंते अमित रामनकट्टी यांनी स्वागत केले.
स्वप्नील डोंगरदेवे म्हणाले, अभियंता हा जरी व्यवसाय असला तरी तो ग्राहकाच्या स्वप्नांशी जोडला गेला आहे. छोट्या-छोट्या चुका देखील होत असतात.त्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी पडून चूक होऊ देऊ नका. ग्राहकाच्या स्वप्नांशी खेळण्याचा अधिकार अभियंत्याला नसून ग्राहकाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी योगदान देणे हे कर्तव्य आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अभियंते काकासाहेब ऐनापुरे, रजनीकांत पाटील, ऋतिक बन्सल यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक दिलीप पठाडे, सोमनाथ परमणे, जुबेर तुरेवाले, श्रेयश मेहता, दीपक वळीवडे, सोमाज भाटले, सुदेश बागडे, प्रमोद जाधव, असिफ मुल्ला यांच्यासह शहर व परिसरातील अभियंते उपस्थित होते. माजी सभापती अजय माने यांनी सूत्रसंचालन केले. अनुप पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta