निपाणी (वार्ता) : बेनाडी (ता.निपाणी) येथील रहिवासी आणि पन्हाळा तालुक्यातील सावर्डे (सातवे) भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक एस. एस. हजारे यांना कोल्हापूर रोटरी क्लब रॉयल्सतर्फे ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे.
हजारे यांनी आतापर्यंत ज्ञानदानासह विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यान दिले आहे. याशिवाय विज्ञानातील विविध प्रयोग सादर केले आहेत. अनेक ठिकाणच्या विज्ञान साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यासह ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे. पर्यावरणाबाबतही त्यांनी प्रबोधनांसह वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवारी (ता. २५) कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात रोटरीचे जिल्हा प्रांतपाल नासीर बोरसद्वाला व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते हजारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे बेनाडी आणि परिसरात कौतुक होत आहे.