राजू पोवार : मंगळवारी होणार मंत्री महोदयांशी बैठक
निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करावे, अतिवृष्टी व महापुरात झालेल्या पिकांना भरपाई मिळावी, शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या ऊसाला भरपाई दिली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील विधानसभेला घेराव घालण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी परिसर विविध घोषणांनी दणाणून सोडला. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह मंत्रीमहोदयांनी समस्या जाणून घेऊन मंगळवारी (ता.21) अधिवेशनामध्ये रयत संघटनेच्या शिष्टमंडळाला एक तास वेळ दिला असून या दिवशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने दोन दिवस सुरू असलेले हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती राजू पोवार यांनी दिली.
शेतकर्यांच्या विद्या समस्या मांडण्यासाठी विधानसभासमोर सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पहिल्या दिवशी दखल न घेतल्याने सलग दुसर्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. बी. पाटील, साखर मंत्री सी. सी. पाटील, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर यांच्यासह लोकप्रतिनिधी रयत संघटनेच्या पदाधिकार्यांची भेट घेऊन सविस्तर समस्या जाणून घेतल्या. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र नाईक, राज्य सचिव जयश्री गुरन्नावर, गंगाधर मेठी, चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार, सुरेश चौगुले, सुभाष शिरगुर त्यांच्याशी चर्चा करून मंगळवारी अधिवेशनामध्ये एक तासाची वेळ मंत्रिमहोदयांनी दिली आहे. त्यावेळी थेट मुख्यमंत्री, कृषी मंत्री व साखर मंत्र्यांची चर्चा होणार आहे. त्यामुळे रयत संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाल्याच्या प्रतिक्रियाही पदाधिकार्यांनी दिल्या.
यावेळी निपाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष आय. एन. बेग, ग्रामिण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, तालुका कार्याध्यक्ष प्रविण सुतळे, रमेश पाटील, विवेक जनवाडे, कलगोंडा कोटगे, श्रीकांत संकपाळ, बाळासाहेब पाटील, सुनील गाडीवड्डर, मलगोंडा मिरजे, बसगोंडा मंगावते, काकासाहेब जाधव, संजय जोमा, अनिकेत खोत, सुखदेव मगदूम, अनंत पाटील, नारायण पाटील, संजय पाटील, सदानंद नागराळे, नामदेव साळुंखे, सुभाष देवर्षी, नानासाहेब कुंभार यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …