
उपनिरीक्षिक उमादेवी; शांतता कमिटीची बैठक
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला आहे. आता नवरात्र उत्सव सुरू होणार असून शहर आणि परिसरात ८० पेक्षा अधिक नवरात्रोत्सव मंडळ दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. या उत्सवातही नियम व अटी पाडून हा सण साजरा करायचा आहे. दुर्गा देवी मूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी डॉल्बी डीजे अथवा कर्णकर्कश वाद्यावर बंदी असून हा सण शांततेत साजरा करावा, असे आवाहन शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांनी केले. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव व दुर्गा माता दौड मंडळ कार्यकत्यांच्या शांतता कमिटी बैठकीत त्या बोलत होत्या.
उमादेवी म्हणाल्या, नवरात्रौत्सवासह दुर्गादौडला अनेक वर्षांची परंपरा आहे. निपाणी परिसरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. या उत्सव काळात मूर्ती आणताना अथवा विसर्जनवेळीडीजेचा पोलिसांनी पोलिसांनी घालून दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. सकाळी मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावू नये, रात्री दहापर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी आहे. त्यानंतर कार्यक्रम कार्यक्रम आढळल्यास संबंधित मंडळावर कारवाई होणार आहे. भाविकांना दर्शनासाठी योग्य प्रकारे सोय करावी. मंडळांकडून नऊ दिवसाच्या काळात जागर व इतर होणारे कार्यक्रम नियम व अटींचे पालन करून पार पाडावेत. याशिवाय अवैध प्रकाराला आळा घालण्यात आला आहे.
बैठकीस शहर व उपनगरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव व दुर्गा माता दौड मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. हवालदार राजू दिवटे यांनी स्वागत केले. सुदर्शन अस्की यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta