Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत घरासमोर लावलेल्या कारची चोरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी घरासमोर लावलेली कार (क्र. एमएच ०९ डीएक्स १८५५) चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबत डॉ. कुरबेट्टी यांनी बसवेश्वर चौक पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. डॉ. कुरबेट्टी यांनी आपली कार नेहमीप्रमाणे बंगल्याच्यासमोर पार्क केली होती. डॉ. कुरबेट्टी हे मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ते बाहेरून आल्यानंतर बंगल्यात गेल्यानंतर काही वेळातच बंगल्याच्या आवारात लावलेली कार लंपास करण्यात आली होती. डॉ. कुरबेट्टी यांनी शहर आणि परिसरात कारचा शोध घेतला. मात्र सापडली नसल्याने बसवेश्वर चौक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार घटनास्थळी उपनिरीक्षक रमेश पवार यांनी पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *