अमित कुंभार : निपाणीत शिवाजी महाराज शौर्य जागरण रथयात्रा
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, धर्म आणि देशासाठी शौर्य गाजवले आहे. त्यांचा आदर्श सर्वासमोर राहावा या उद्देशाने शौर्य रथयात्रा काढली आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात शिवाजी महाराजांचे गुण आचरणात आणले पाहिजेत. महिलांनीही झाशीची राणी, राजमाता जिजाऊ यांचे शौर्य डोळ्यासमोर ठेवून डोळ्यासमोर समाजात कार्य करणे आवश्यक आहे. महिलांच्या वर होणाऱ्या अन्यायाबाबत प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवून लढा द्यावा, असे आवाहन बजरंग दलाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक अमित कुंभार यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्या भिषेक सोहळा वर्ष व विश्व हिंदू परिषदेची षष्ठीपुर्ती वर्षानिमित्त बजरंग दलातर्फे निपाणीत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रे प्रसंगी व्याख्यानात ते बोलत होते.
येथील मानवी कॉम्प्लेक्स जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासना रूढ पुतळ्याचे पूजन करून मिरवणूकीचे स्वागत झाले. त्यानंतर बस स्थानक चौकातील धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर येथील बस स्थानक सर्कल धर्मवीर संभाजीराजे चौक, साखरवाडी, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी मालुसरे चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, जोशी गल्ली, बेळगाव नका, जुना मोटर स्टॅन्ड, मार्गे पुन्हा नरवीर तानाजी मालुसरे चौक चौकात मिरवणूक आली. यावेळी चौकात व्याख्यानातून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अजित पारळे जिल्हा सहसंयोजक, सुमित पारळे निपाणी सहसंयोजक, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्ष, विश्वजीत यादव, बबन निर्मळे, अमोल चेंडके, राजेश आवटे, संतोष देवडकर, ओंकार भोसले, विशाल जाधव, अतिश चव्हाण, ज्ञानेश्वर ढेरे, प्रसाद जोशी, वैष्णव चौगुले, सचयोग कल्लोळे, अनिल बागडी, सागर खांबे, जुगल वैष्णव, माय्याप्पा राऊत, सरिता पारळे, नम्रता पोवार, मानसी आवटे पवन अंकोशे आकाश मल्लाडे, आकाश कांबळे यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.