Thursday , September 19 2024
Breaking News

बोरगाव अरिहंत दूध उत्पादक संघाकडून विक्रमी बोनस वाटप

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या वतीने संघाच्या सभागृहात सभासदांना बोनस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तम पाटील यांनी,संघाकडून यावर्षी म्हैस विभागातून 2 लाख 25 हजार 535 लिटर दूध तर, गाय विभागातून 61 हजार 850 लिटर दूध उत्पादकांनी दूध पुरवठा करत एकूण सालात 2 लाख 87 हजार 385 दूध संकलन करण्यात आले आहे. तसेच दूध उत्पादका बरोबरच ग्राहकांनाही भेटवस्तू देणारी हि संस्था असल्याने दूध उत्पादका बरोबर ग्राहकांची नाळ जोडण्याचे काम संघाने चालवले आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी दूध उत्पादकांना आपण उच्चंकी बोनस देत असतो. यावर्षी म्हैस दूध उत्पादकांना 4.35 टक्के व गाय दूध उत्पादकांना 3.58 टक्के बिन कपात बोनस दिले आहे. एकूण सभासदांना सुमारे 5 लाख 12 हजार 463 रुपये विक्रमी बोनस यावर्षी वितरण केले असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगून शहरातील सुमारे 1263 जनावरांना लाळ खुरकत व 100 हून अधिक जनावरांना लंपिस्कीन लसीचे मोफत वितरण केले आहे.वासू संगोपन योजनेखाली मोफत वैद्यकीय सेवा, योग्य फॅटला योग्य दर असे विविध योजना आपण संघाच्या वतीने देत असल्याचे सांगितले.
तसेच संघास सर्वाधिक दूध पुरवठा केलेल्या मध्ये म्हैस विभागात आदित्य कोरे, प्रकाश चव्हाण, सुनिता पुणेकर यांनी अनुक्रमे सर्वाधिक दूध पुरवठा केला आहे. तर गाय विभागात भरत अम्मान्नवर, बाहुबली हवले, पंकज बसन्नावर, यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अफराज, संचालक मंडळात मायगोंड पाटील, शितल हवले, रमेश माळी, रावसाहेब पाटील, भारती सावळवाडे, वैशाली बुलबुले, हिराचंद चव्हाण, जयपाल कोरवी, बाळासाहेब मडिवाळ, नगरसेवक अभयकुमार मगदूम, पी.के.पी.एस. संघाचे आर. टी. चौगुले, व्यवस्थापक बाहुबली कवटे यांच्यासह दूध उत्पादक ,ग्राहक व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

Spread the love  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *