Sunday , July 26 2026
Breaking News

कलाकार अशोक शेवाळे पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आडी येथील रहिवासी व लोकनाट्य तमाशा कलाकार अशोक शेवाळे यांना तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वडगाव आंबले (ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे पुरस्काराने गौरविण्यात आले. सद्गुरु दत्तात्रय महाराज यांची 52 वी पुण्यतिथी व सद्गुरु गोदाराम बाबा महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
प्रकाश खांडके यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. अशोक शेवाळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कांडगाव येथील सुरेश कांडगावकर लोकनाट्य तमाशा फडात सोंगाड्याचे पात्र करतात. गेली 35 वर्षे महाराष्ट्रसह सीमाभागात अनेक ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली आहे. महाराष्ट्रातील विविध संस्थांचे तसेच रत्नागिरी महोत्सव, हंपी महोत्सव येथे पुरस्कारातून त्यांच्या कलेचा गौरव झाला आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *