महादेव गल्ली एसपी ग्रुप उपविजेता : निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे स्पर्धा
निपाणी (वार्ता) : येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे आयोजित राजमनी ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात महादेव गल्लीमधील एसपी ग्रुप संघाला १:० गोलने पराभव करून साई शंकर नगर मधील दिवंगत विश्वासराव शिंदे तरुण मंडळ एसटीएम ग्रुपने विजेतेपद पटकावले. तर एसपी ग्रुपला उपविजेचे पदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला ११ हजार रुपये तर उपविजेत्या महादेव गल्ली एसपी ग्रुप संघाला ७ हजार रुपये व राजमनी ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते.
सचिन फुटाणकर यांनी यांनी प्रास्ताविकात निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या कार्याचा आढावा घेतला. लक्ष्मण चिंगळे यांनी, स्पर्धेतील हार-जित पेक्षा खेळ महत्त्वाचा असून प्रत्येकाने खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. प्रतीकशहा यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेत प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ दि मॅच म्हणून अनिकेत रावण, आशिष पाटील, हर्ष मधुकर, विनायक दिवटे, सौरभ खामकर, अथर्व साळवे, प्रणव माने, गुरुनाथ कुणकेकर, ओम कदम, राहुल राजपुरोहित, पृथ्वीराज चव्हाण तर मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून कृष्णा मुचंडी, बेस्ट गोलकिपर म्हणून राहुल राज पुरोहित, बेस्ट डिफेंडर म्हणून आशिष भाट, मिड फिल्डर रामदास जाधव, अंतिम सामन्यात मॅन ऑफ दि मॅच म्हणून जीत फुटानकर, बेस्ट फॉरवर्ड म्हणून शुभम देसाई यांना गौरवण्यात आले. पंच म्हणून सचिन फुटाणकर, प्रशांत आजरेकर, करण माने यांनी काम पाहिले. महावीर आरोग्य सेवा संघातर्फे रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमास हालशुगरचे संचालक विनायक पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे, डॉ. सी.बी. कुरबेट्टी, शिरीष शहा, डॉ. नितीन शहा, डॉ. उषा शहा, माजी सभापती सुनील पाटील, संजय मुरवाडे अवधूत गुरव, प्रमोद पाटील, रोहित पाटील, आकाश खवरे, आशिष शहा, सोमनाथ शिंदे, ओंकार शिंदे यांच्यासह फुटबॉल प्रेमी उपस्थित होते. आशिष भाट यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta