निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.९) सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर होणार आहे. अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये हे शिबिर होणार आहे.
मोफत नेत्र तपासणी, कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी संबंधी आजारावर मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तरी गरजुंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे अवाहन के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, रोटरी क्लब अध्यक्ष प्रवीण तारळे, सेक्रेटरी राजेश तिळवे, खजिनदार श्रीमंधर होनवाडे, के.एल.ई.एस. रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta