हेस्कॉमची कुर्हाड : छाटणी अशास्त्रीय असल्याचा आरोप
निपाणी : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर हेस्कॉमकडून शहरातील वीजतारांना अडथळा ठरणार्या उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणी केली जाते. मात्र निपाणी शहर आणि उपनगरात मजुरांकडून अशास्त्रीय पद्धतीने फांद्या छाटल्या जात आहेत.
फांद्या नसल्याने झाडे धोकादायक होऊन वादळवार्यात उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. शिवाय काही ठिकाणी मुळासकट झाडे काढली जात असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकामधून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांना फांद्या घासून दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, या उद्देशाने दरवर्षी हेस्कॉमकडून मे महिन्यापासून झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. झाडांची छाटणी करताना केवळ वीजतारांना होणारा अडथळा लक्षात घेतला जातो.
मात्र त्यांची नैसर्गिक रचना आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब छाटणीसाठी केला जात नसल्याने झाडांची नैसर्गिक रचना धोक्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शहर आणि उपनगरातील डेरेदार वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याची टीका पर्यावरण प्रेमींकडून होते.
शहरात रेन ट्री, काशिद, गुलमोहर, पेल्ट्राफोरम, चोपडी सावर यांच्यासारखी विदेशी झाडेही आहेत. ही झाडे अधिक कमकुवत असतात. आणि त्यातच जर त्यांच्या फांद्यांचा तोल बिघडला तर लवकर कोसळतात, असे वृक्ष अभ्यासकांचे म्हणणे आहे.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …