पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम : विविध शर्यती संपन्न
कोगनोळी : बिरोबाच्या नावानं चांगभलं, खारीक, खोबरे, भंडाराच्या उधळणीत कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीने संपन्न झाली.
शनिवार तारीख 4 रोजी माजी मंत्री वीरकुमार पाटील व सी. के. पाटील यांचे मानाचे तोरण अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत कर बांधून यात्रेची सुरुवात झाली.
रोज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम रात्री ढोल वादन (वालंग), पालखी मंदिर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाली. सोमवार तारीख 6 रोजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. रात्री ढोल वादन (वालंग), पालखी प्रदक्षिणा, हेडाम खेळवणे, पहाटे भुदरगड तालुका राधानगरी येथील कृष्णात ढोणे महाराज यांची पहिली भाकणूक झाली.
मंगळवार तारीख 7 रोजी सकाळी 9 वाजता भाजप पुरस्कृत विविध शर्यती संपन्न झाल्या. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दिवसभर नैवेद्य देण्यासाठी पंचक्रोशीतील महिलांनी गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजता माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, योगेश पाटील, कृष्णात ढोणे महाराज, महादेव मानकू पाटील, जिनगोंडा पाटील-आक्कोळे, शिवाजी कागले, बाबुराव एडके, कुमार पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.
बुधवार तारीख 8 रोजी सकाळी बिरदेव यात्रा कमिटी यांच्यावतीने विविध शर्यती संपन्न झाल्या. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी चार वाजता भव्य पालखी सोहळा सुरू झाला. पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणा करून गावातील बिरदेव मंदिरात सवाद्य मिरवणुकीने आल्या. यावेळी खारीक, खोबरे, भंडार्याची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली. पाच दिवस चाललेल्या बिरदेव यात्रेची सांगता केली. अनेक भाविकांनी दंडवत घातले. अनेक भाविकांनी उत्सवाचे नवरात्र यावेळी सोडले.
सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी बिरदेव यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष बबन पाटील, सुरेश पाटील कापशीकर, शरद पाटील, विठ्ठल कोळेकर, अनिल पाटील, ब्रह्मनाथ चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta