निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल) येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता. आप्पासाहेब पुजारी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाकर यांच्या हस्ते दीपस्तंभाचे पूजन झाले. दीपस्तंभ आणि मंदिर परिसरात पणत्या लावण्यात आल्या. त्यानंतर मंदिर परिसरामध्ये भाविकांनी लावलेल्या हजारो पणत्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. यावेळी तुळजा भवानीची विधीपूर्वक पूजाअर्चा करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांना दूध व प्रसाद वाटप करण्यात आले. शरद पुजारी यांनी पौरोहित्य केले.
यावेळी श्रीकांत पुजारी, प्रमोद पुजारी, ओमकार पुजारी, भरत पुजारी, प्रसाद पुजारी, राजू पुजारी, सुरेश पुजारी, विजय पुजारी, श्रीमंत युवराज सिद्धूजीराजे निपाणकर, श्रीमंत सुकीर्तीराजे निपाणकर, श्रीमंत राजेश्वरीराजे निपाणकर, श्रीमंत राजकुमारी ऋतंबराराजे निपाणकर, विवेक चव्हाण, सुजित गायकवाड, युवराज बगाडे, सचिन शिरगावे, प्रदीप स्वामी, प्रवीण पाटील, श्रीकांत केनवडे, रूपाली पुजारी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta