केंद्रीय गृहमंत्र्यांना हिंदु जनजागृतीचे निवेदन
निपाणी (वार्ता) : पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भीषण हल्ला करून १४०० हून अधिक लोकांची निघृण हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान मुलांचाही शिरच्छेद केला. अशा राक्षसी ‘हमास’ला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि ‘हमास’ तसेच तिला पोसणाऱ्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणाऱ्यांवर आणि आंदोलने करणाऱ्यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसीलदार मुज्जफर बाळीगार यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ ही जागतिक स्तरावरील क्रूर आतंकवादी संघटना आहे. इस्रायलसह अमेरिका, युरोपीय संघ, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारखे पाश्चिमात्य देश आणि मिस्र, युएई, साऊदी अरब यांसारखे इस्लामी देश ‘हमास’ला आतंकवादी संघटना मानतात. इस्रायलवरील हल्ल्यात १४०० निष्पाप नागरिकांच्या हत्या करणाऱ्या या आतंकवादी संघटनेला भारतानेही आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.
हमास’च्या समर्थनार्थ लेबनॉनची ‘हिजबुल्लाह’ ही आतंकवादी संघटना, तसेच येमेनमधील ‘हूती’ ही आतंकवादी संघटना
इस्रायल विरोधात सशस्र लढा देत आहे. आतंकवाद्यांना आतंकवादी संघटनाच साहाय्य करणार, त्याप्रमाणे हे आहे. जर उद्या अशा आतंकवाद्यांनी भारतात आतंकवादी आक्रमणे केली, तर आज ‘हमास’ला समर्थन करणारे त्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थही रस्त्यावर उतरतील. काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर अशाप्रकारे आक्रमणे झाल्याचा देशासमोर आहे. त्यामुळे ‘हमास’ला समर्थन करणारे हे येणाऱ्या काळात देशातील अंतर्गत संघर्षाला कारणीभूत ठरतील आणि देश गृहयुद्धाच्या दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आतंकवाद्यांच्या समर्थकांना वेळीच पायबंद घालायला हवा. ‘हमास’ प्रती लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही नागरिकाच्या मनात सहानुभूती कशी काय असू शकते ? त्यामुळे केंद्र शासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ‘सद्गुरु त्वायक्वांदो अकॅडमी’ चे संस्थापक बबन निर्मळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अजित पारळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभिनंदन भोसले, गुरुकुल करिअर अकॅडमीचे चारुदत्त पावले, हिंदु जनजागृती समितीचे अनिल बुडके, गौतमेश तोरस्कर, योगेश चौगुले यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.