
निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानक परिसरात मंडल पोलीस निरीक्षक एस. बी. तळवार आणि सहकाऱ्यांनी ४०० ग्रॅम गांजा जप्त केल्याची घटना बुधवारी (ता.२२) सायंकाळी घडली आहे.याप्रकरणी अक्षय उर्फ पिंटू अनिल कांबळे (वय २५ रा. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अक्षय हा गांजा विक्रीसाठी निपाणीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंडल पोलीस निरीक्षक बी एस. तळवार आणि सहकाऱ्यांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. या ऐकारवाई मध्ये पोलीस हवालदार शेखर असोदे, गोपाळ बडीगेर, श्रीशैल गळतगी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta