निपाणी (वार्ता) : आडी येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत प्रभाकर होनमाने -जुनून यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. तर अमर शिंदे- दानोळी यांच्या बैल जोडीने द्वितीय क्रमांक आणि प्रवीण बाळू सरकार- अरग यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनात चतुर्थ क्रमांक बंडा शिंदे -दानोळी यांच्या गाडीने पटकाविले.
घोडेस्वार शर्यतीत परसू नाईक- वाळकी, शशिकांत एडके- भेंडवडे, जीवन माने- नांगनूर, घोडागाडी ‘ब’ गट शर्यतीमध्ये अमोल पाटील- कोगनोळी, अक्षय माळुंगे-म्हाळुंगे, अण्णा खोत- इंगळी, बिनादाती घोडा-बैलगाडी शर्यतीत दर्शन पाटील -वळीवडे, हेमंत हरेर- आडी, विठ्ठल जिडीमनी- अलकनूर, विजय खोत- आडी, सुकुमार नांद्रे- रुकडी, जनरल घोडा बैल- गाडी शर्यतीमध्ये हेमंत हरेर- आडी, डॉ. तारदाळकर -तारदाळ, सोनू भोसे, प्रवीण कदम यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला.
शर्यती मैदानाचे उद्घाटन हाल शुगर कारखान्याचे संचालक मलगोंडा पाटील -बंदूक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशाल पाटील, प्रकाश पाटील, सचिन पाटील, आप्पासाहेब येडूरे, सिद्धू काडाप, आप्पासो सबगोंड, रुद्रगौडा पाटील, मलगोडा पाटील, कलगोंडा पाटील, काशिनाथ पिरगोंड, भालचंद्र बापुळे, आप्पासो कलगोंड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta