निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या निपाणीजवळील प्रसिद्ध ३ छाप बिडी कारखान्याचे कार्यालय फोडून चोरट्यांनी १ लाख २५ हजाराची रोकड, डीव्हीआर सेट मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला.
निपाणी शहराच्या लगत असलेल्या महामार्गाच्या पूर्वेला ३० छाप बिडी कारखाना व कार्यालय आहे. गुरुवारी (ता.३०) दिवसभर सायंकाळी सहा वाजता कार्यालय बंद करून कर्मचारी घरी गेले होते. कारखाना प्रशासनाने दोन स्वतंत्र सिक्युरिटी कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी सिक्युरिटी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत चोरी करून आपला मोर्चा कारखाना गोडाऊनकडे वळविला. यावेळी चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूपही तोडले. शुक्रवारी (ता.१) सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानुसार त्याची माहिती शहर पोलीस पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार उपनिरीक्षिका उमादेवी आणि सहकार्यानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी व्यवस्थापक बी. रमेश. पै यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.