Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढीस लागावी यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनासाठी चांद्रयानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती… आर्यन पाटील या विद्यार्थ्यांने ही प्रतिकृती तयार केली होती.
विद्यार्थ्यांना निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी समजाव्यात, निरीक्षण वृत्ती वाढावी व भावी शास्त्रज्ञ होण्यासाठी आपण प्रयत्न करत करावेत असे प्रोत्साहनपर मनोगत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. या प्रतिकृती प्रदर्शनात ठिबक सिंचन, यंत्रमानव, पाण्यावरची शेती, सौरमंडळ, सूर्यग्रहण चंद्रग्रहण, फुफ्फुस व हृदयाचे कार्य, डीएनए माॅडेल, कचरा उचलणी यंत्र यासारख्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या. या प्रदर्शनासाठी विज्ञान विभाग प्रमुख सविता पवार, विषय शिक्षक उषा काकतकर, शीतल बडमंजी, मंजुषा पाटील, प्रसाद सावंत, शांताराम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षण संयोजिका निला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत व शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रसाद मोळेराखी व प्रथमेश चांदिलकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *