Monday , September 21 2026
Breaking News

महामेळाव्याला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; युवा समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय येथे युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार 4 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या मेळावा यशस्वी करण्याचा ठराव संमत करण्यात आला आणि सदर महामेळाव्याला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आपली ताकत दाखवावी, असे आवाहन करण्यात आले.
कन्नड संघटनांनी बेळगावमध्ये जो धुडगूस घातला आहे आणि मराठी व इंग्रजी फलक लक्ष करण्यात येत आहेत आणि त्याचवेळी पोलीस बघ्याची, भूमिका घेत आहेत त्याचा या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला व भाषिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
सदर बैठकीत तालुका प्रमुख मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी विचार मांडले.
बैठकीला उपाध्यक्ष राजू कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, महेश जाधव, आकाश भेकने, आनंद पाटील, विशाल अनवेकर आदी उपस्थित होते. चिटणीस प्रतीक पाटील यानी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *